आज आपण या article मधे वंदनीय श्री. बंकिमचंद्र चटर्जी लिखित "वंदे मातरम्" . बघणार आहोत आणि त्याचा इतिहास देखिल आपण थोडक्यात बघणार आहोत.
भारताचा स्वातंत्र्य लढा १८५७ च्या सशस्त्र क्रांतीपासून सुरू झाला. हा लढा यशस्वी झाला नसला, तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या रूपांत प्रकट होत राहिली.
बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब हे सशस्त्र क्रांतीचे केंद्र बनले. सुखदेव, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू,
स्वातंवीर सावरकर यांच्या सारख्या झपाटलेल्या क्रांतिवीरांनी इंग्रजांच्या विरूद्ध ही क्रांतीची मशाल तेवत ठेवली. परंतु ही क्रांती वैयक्तिक पातळीवर किवा छोट्या समूहापर्यंत मर्यादित होती.
अठराशे सत्तरच्या दशकात एका वेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या म्हणजे १८८५ पूर्वीचा तो काळ होता. इंग्रजांचे कुटिल कारस्थान आणि जुलमी राजवटीमुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ लागली. अशा या वातावरणात वंदे मातरम् या गीताचा जन्म झाला.
कोलकता विश्वविद्यालयाच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात बंकिमचंद्र चटर्जी यांनी या विद्यापीठातून B.A पदवी प्राप्त केली. इंग्रज सरकारने त्यांची नियुक्ती कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून केली. नंतर ते कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाले. बंकिमचंद्र प्रखर देशभक्त होते. त्यांना मागील शतकातील संन्याशांचे बंड आणि १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यांचे फार आकर्षण होते.
1857 साली इंग्रज सरकारने ‘गॉड सेव्ह दी क्वीन' हे ब्रिटिशांचे राष्ट्रगीत भारतात रुजू करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे राष्ट्रगीत भारताचेही राष्ट्रगीत आहे, अशी वातावरण निर्मिती करण्याकरिता कार्यक्रमात, सैन्यात आणि शाळांमध्ये त्यांनी हे गीत रुजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बंकिमचंद्र खूप संतप्त झाले.
सन् १८७६चा तो काळ होता. भारतीय लोक या ब्रिटिश राष्ट्रगीताचा तिरस्कार करीत होते. बंकिमचंद्रांनी या विषयावर गहन विचार केला.
त्यांच्या लक्षात आले की गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारत हा कधीच अखंड असा देश नव्हता आणि भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते. म्हणून १८७६ मध्ये ७ नोव्हेंबरला त्यांनी देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले आणि भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करून तिचे नमन करणारे वंदे मातरम् हे सहा कडव्यांचे गीत लिहिले.
आपल्या मित्रांना हे गीत वाचून दाखवल्यावर ते म्हणाले की, हे भारतीयांचे खरे राष्ट्रगीत असले पाहिजे. बंकिमचंद्रांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड' या ऐतिहासिक घटनेवर आधारित "आनंद मठ " ही कादंबरी इ.स. १८८२ साली लिहिली.
त्यांनी या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत समाविष्ट केले.
या कादंबरीत देशभक्त संन्यासी वंदे मातरम् हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे
वंदे मातरम् – VANDE MATARAM LYRICS IN MARATHI
वंदनीय श्री. बंकिमचंद्र चटर्जी लिखित "वंदे मातरम्" .
वंदे मातरम् !
सुजलाम सुफलाम् मलयजशीतलाम् शस्य श्यामलां मातरम् ॥
शुभ्रज्योत्सना - पुलकित यामिनीम् फुल्ल कुसुमित-द्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुरभाषिणीम् सुखदां वरदां मातरम् ॥
सप्तकोटि कण्ठ-कलकल-निनादकराले द्विसप्तकोटि भुजैर्धृत खरकरवाले अबला के मां तू मि एतो बले! बहुबल धारिणीम्, नमामि तारिणीम् रिपुदलवारिणीम् मातरम् ॥
तुमि विद्या, तुमि धर्म, तुमि हृदि, तुमि कर्म, त्वं हि प्राणः शरिरे, बाहुते तुमी मां शक्ति, ह्रदये तुमी मां भक्ति, तोमारई प्रतिमा गाडी मन्दिरे-मन्दिरे ॥
त्वं हि दुर्गा दशप्रहारण धारिणीं, कमला कमल-दल-विहारिणीं, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वां, नमामि कमलां अमलां अतुलाम, सुजलां सुफलाम् मातरम् ॥
श्यामलां, सरलां, सुस्मिताम् भूषिताम्, धरणीं भरणीं मातरम् ll