Ashadhi Ekadashi 2022 Wishes In Marathi: आषाढी एकादशी च्या शुभेच्छा ...
आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदाय, वारकरी मित्रांना, विठू माऊलींच्या भक्तांना पांडुरंगा च्या भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा खास मराठमोळ्या शुभेच्छा
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
"सुखासाठी करिसी तळमळ तरी तू पंढरीस जाय एकवेळ मग तू अवघाची सुखरूप जैसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, शुभेच्छा आषाढी एकादशी च्या!!!
ashadi ekadashi 2022
आषाढी एकादशी 2022: आषाढी एकादशी 2022
उपवासाने सर्व रोग दूर होतील, सर्व मनोकामना पूर्ण होतील
रूप पाहता लोचनी सुख जाले ओ साजणी , तो हा विठ्ठल बरखा तो हा माधव बरखा बहुता सुकृतांची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर , आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल- रूक्मिणीच्या भक्तांसाठी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) हा वर्षातला सर्वात खास दिवस असतो.
यावर्षी आषाढीला मागील 2 वर्षांप्रमाणे कोविड 19 च्या नियमांचं बंधन नसल्याने सेलिब्रेशनला एक नवा जो आनंद असणार आहे.
10 जुलै, रविवारी यंदा आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) साजरी केली जाणार असल्याने या दिवसाच्या निमित्ताने वारकरी मित्रांना, विठू माऊलींच्या भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा खास मराठमोळ्या शुभेच्छा (social media) माध्यमातून द्यावा.
पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरापासून गल्लीबोळ्यातील विठ्ठल मंदिरं देखील आषाढी एकादशीच्या निमित्ताने उजळून निघतात.
मागील दोन वर्ष आषाढीला देव आणि भक्तांमध्येही अंतर पडलं होतं परंतु यंदा ही कसर सारेच भक्तमंडळी भरून काढणार आहेत मग या आषाढीच्या निमित्ताने तुमच्या मित्रमंडळींचा, प्रियजणांचा दिवस आनंदाने साजरा करा.
आषाढी एकादशी हा दिवस देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी विष्णू देव पुढील 4 महिन्यांसाठी निद्रावस्थेमध्ये जातात अशी भक्तांची धारणा आहे.
त्यामुळे आषाढी ते कार्तिकी एकादशी असा चार महिन्यांचा चातुर्मास देखील पाळला जातो.
एकादशीच्या निमित्त एक दिवसाचं व्रत पाळलं जातं. त्या निमित्ताने हलका आहार, त्याला आपण उपवास म्हणतो दूध, फळं खाण्याचा नियम पाळला जात असतो.
उपवासाच अनन्यसाधारण महत्व आपल्याला माहिती आहे.
तर् मित्रांनो आजचे हे article आपल्याला कसे वाटले हे नक्कीच comment मधे सांगा.
हे पण वाचा >>