११ मार्च, २०१२

10,000 जाहिरातींचा जबरदस्त संग्रह

 ह्या संकेतस्थळावर 1830 ते 1920 ह्या काळात विविध वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये छापल्या गेलेल्या 10,000 जाहिराती पहायला मिळतात. एवढा मोठा जुन्या जाहिरातींचा एकत्रित संग्रह करणारं दुसरं संकेतस्थळ असणं अवघड आहे.

बरेच दिवसांत संगणक डॉट इन्फो वर वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईट संबंधी काही आलं नाही अशी आठवण करणारी एक ईमेल परवा आली. ती ईमेल आली आणि लगेचच वेब भ्रमंतीत www.jaypaull.com सापडली. ह्या संकेतस्थळावर 1830 ते 1920 ह्या काळात विविध वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये छापल्या गेलेल्या 10,000जाहिराती पहायला मिळतात. एवढा मोठा जुन्या जाहिरातींचा एकत्रित संग्रह करणारं दुसरं संकेतस्थळ असणं अवघड आहे.
ज्ये पॉल ह्या 42 वर्षीय उत्साही माणसाने ह्या संग्रहाचा उपदव्याप केला आहे. 90 वर्षांपूर्वीच्या ह्या जाहिराती अर्थातच कृष्ण-धवल प्रकारातल्या आणि साध्या रेखाचित्रांच्या आहेत. 1900 नंतरच्या जाहिरातींमध्ये छायाचित्रे आहेत, नाही असे नाही. पण त्यांनाही एक जुना बाज आहे. आज पहायला त्या नक्कीच प्रेक्षणीय वाटतात.
jaypaull.com चं होम पेज

ज्ये पॉलच्या कुटुंबात संग्रह करण्याचा छंद किमान तीन पिढ्यांचा आहे. त्याच्या पणजी आणि पंजोबांनी 1888 च्या आसपासची वृत्तपत्रे जमविली होती. ज्येच्या आजीने हा संग्रह ज्येकडे सोपवला. ज्येने त्यात भर घालणं चालू ठेवलं. त्यातून jaypaull.com तयार झाली. आपल्याला भारतात माहीत असलेली उत्पादने म्हणजे कोलगेट, कोकाकोला, पेप्सीकोला, पाँडस, केलॉग्ज, सींगर शिवण यंत्र, अमेरिकन एक्सप्रेस, जिलेट सेफ्टी रेझर, कोडॅक फिल्म, हेंझ सॉस, पिअर्स सोप वगैरे वगैरे. ह्या जाहिराती एकूण 36 प्रकारांत विभागल्या आहेत. तसंच त्यांना Search Library अशा सोयी असल्याने त्या पाहणं सहज सुलभ आहे.
नक्कीच एक वैशिष्ट्यपूर्ण संकेतस्थळ म्हणू jaypaull.com चा उल्लेख करायला हवा. 

1 टिप्पणी:

  1. शिरवळकर साहेब, फारच मनोरंजनात्मक माहिती पुरविलीत... मनःपूर्वक धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा