२२ फेब्रु, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-5)

स्वतःच्या कार्टुनबरोबर कीम डॉटकॉम..
 कीमचं आयुष्य हे आता फक्त एक हॅकर म्हणून उरलेलं नव्हतं. हेराफेरी करणारा एक बीझनेसमन म्हणूनही त्याची ख्याती हळूहळू पसरू लागलेली होती. ह्या ख्यातीत तो स्वतःही भर घालत असे. 2001 मध्ये इंग्लंडमधल्या ‘गार्डियन’ ह्या सुप्रसिद्ध दैनिकाला मुलाखत देताना त्याने सांगितले की सिटीबँकेच्या सिस्टममध्ये घुसखोरी करून त्याने 20 दशलक्ष डॉलर्स काढून ते ग्रीनपीस ह्या सामाजिक संस्थेच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले.

2001 साली इतर डॉट कॉम कंपन्यांना घरघर लागलेली असताना कीमने letsbuyit.com कंपनीच्या शेअर्सची धुर्तपणाने खरेदी विक्री कशी केली, आणि त्यातून त्याचे खिसे कसे भरले हे आपण पाहिलं. 1.5 दशलक्ष डॉलर्सचा म्हणजे रूपयांमध्ये पहायचं तर साडेसात कोटींचा नफा त्याला झाला होता. कीमचं आयुष्य हे आता फक्त एक हॅकर म्हणून उरलेलं नव्हतं. हेराफेरी करणारा एक बीझनेसमन म्हणूनही त्याची ख्याती हळूहळू पसरू लागलेली होती. ह्या ख्यातीत तो स्वतःही भर घालत असे. 2001 मध्ये इंग्लंडमधल्या ‘गार्डियन’ ह्या सुप्रसिद्ध दैनिकाला मुलाखत देताना त्याने सांगितले की सिटीबँकेच्या सिस्टममध्ये घुसखोरी करून त्याने 20 दशलक्ष डॉलर्स काढून ते ग्रीनपीस ह्या सामाजिक संस्थेच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले. याचा सिटीबँकेने तर इन्कार केलाच, पण ग्रीनपीस संस्थेनेही इन्कार केला. त्याचे हे असले उद्योग अनेक हॅकर्सनाही आवडत नव्हते. काही हॅकर ग्रुप्सच्या मते कीम श्मिट हा फक्त बोलबच्चनगिरी करीत होता. हॅकींगचं काम तो त्याच्या पगारी सहकाऱ्यांकडून करतो असं त्या हॅकर्सचं टोकाचं मत होतं. पेटागॉनच्या सर्व्हर्समध्ये शिरण्याएवढं ज्ञान कीमला नाही असं ते हॅकर्स ठामपणे इंटरनेटवरील फोरम्समध्ये सांगत होते. पण ह्या सर्व बदनामीचा कीमच्या मनावर काहीही परिणाम होत नव्हता. आपल्या विलासी आयुष्यात तो मग्न होता.
हाच तो किंबल स्पेशल एजंट
विलासीनते बरोबर चक्रमपणा हाही कीमचा एक स्थायीभाव आहे. उदाहरण सांगायचं तर त्याने स्वतःवर ‘किंबल स्पेशल एजन्ट’ नावाची छोटी कार्टून फिल्म तयार केली. त्यात हा जेम्स बाँड स्टाईलचा पण कीमएवढा जाडजूड एजंट काळा गॉगल घालून वेगवान मोटारी चालवताना दाखवलं होतं.  नंतर तो धडाक्याने बोटीतून येतो आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेटसच्या घराच्या भिंती उद्धवस्त करीत आत प्रवेश करतो. किंबल एजन्टच्या हातात महाबंदूक असते. त्याने तो बिल गेटसच्या भोवती गोळ्या झाडतो. त्या झाडलेल्या गोळ्यांची अक्षरे बनतात – LINUX. बिल गेटसची Windows आणि जगाने मोफत तयार केलेली LINUX यांच्यातल्या स्पर्धेबद्दल आपल्याला माहितच आहे. बिल गेटसवर गोळ्या झाडल्याने बिल गेटसची बोबडी वळते आणि त्याला चक्क पँटीतच होताना त्या कार्टून फिल्ममध्ये दाखविलं होतं.
ज्यांना ही कार्टून (फ्लॅश) फिल्म पहायची आहे त्यांच्यासाठी लिंक खाली देत आहे:
http://fliiby.com/file/837505/juf2xuoiiy.html
हा सारा पोरकटपणा होता. पण कीम थांबायला तयार नव्हता. पुढे कीमने Kimble goes Monaco नावाचा सिनेमा स्वतःवरच काढला. मोनेको हा छोटा देश आहे. त्याची लोकसंख्या जेमतेम 35,000 आहे. म्हणजे आपल्या एखाद्या गावाएवढी. देशाला फक्त साडेचार किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. हा छोटासा देश मुख्यत्वे तिथे येणाऱ्या पर्यटकांवरच चालतो. अशा देशात जाऊन किंबल म्हणजे कीम, मोटारींची एक शर्यत आयोजित करतो. त्याचे मित्र आणि मैत्रिणी मोनेकोच्या समुद्रात एक आलिशान जहाज (यॉट) भाड्याने घेतात. त्यात पार्ट्या करतात. मग जहाजावर बसून लॅपटॉप संगणकाचं एक बटण दाबून त्या मोटारींच्या शर्यतीत धावणाऱ्या एका विशिष्ट मोटारीत स्फोट करतात. असा सगळा निरर्थक सिनेमा तयार करण्यासाठी त्याने म्हणे दोन चार कोटी रूपये खर्च केले. हा सिनेमा फार छोटा आहे. साधारणतः तासाभरातच तो संपतो. ज्यांना तो पहायचा आहे त्यांनी खालील लिंकवर क्लीक करून यु ट्युबवर पहावा.
किंबल गोज मोनेको - भाग - 1 http://www.youtube.com/watch?v=S5ZBZV8hFb4
किंबल गोज मोनेको - भाग - 2 http://www.youtube.com/watch?v=dzuGrK-ZFA8
किम स्वतः बेफाट ड्रायव्हिंग करतो. सहजपणे वेगाचा आकडा 200 च्या पुढे नेणं हा त्याचा हातचा मळ. त्याच्या ह्या वेगाला घाबरून न्युझीलंडमधल्या त्याच्या हवेलीच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी त्याबद्दल तक्रारीही केल्या होत्या.
2001 मध्ये तर जगप्रसिद्ध गमबॉल 3000 मोटर रेसमध्ये त्याने भाग घेतला. प्रत्यक्ष वेगवेगळ्या शहरांतील हमरस्त्यांवरून 3000 किलोमीटर अंतराची ही कार रेस आहे. लंडनहून निघून बर्लीन, हेलसिंकी, स्टॉकहोम, कोपेनहेगन अशा शहरांतून महावेगाने ह्या मोटरकार्स वीजेच्या वेगाने धावत शर्यतीत जिंकण्याचा प्रयत्न करतात. कीमने सुमारे 280 किलोमीटर वेगाने कार चालवून ही 3000 किलोमीटरची रेस प्रथम क्रमांकाने जिंकली. जराही अंदाज चुकला असता तर कीम महाशय न्युझीलंडवासी होण्याऐवजी स्वर्गवासी झाले असते.
थोडक्यात काय तर पोरकटपणा, अत्रंगीपणा आणि श्रीमंतीचा शोक ह्या गोष्टी आपल्या बुद्धीमत्तेवर पुर्ण करण्याचा हव्यास कीम डॉटकॉम ह्या माणसाला होता. नैतिकतेशी त्याचं देणं घेणं नव्हतं. पहिल्या भागात मी लिहील्याप्रमाणे त्याचं आयुष्य म्हणजे एक कादंबरीच आहे. पुढे त्याने megaupload.com नावाची वेबसाईट सुरू केली. त्यातून प्रचंड माया जमवली. ती सारी हकीगत तपशीलाने सांगत बसलो तर एखादी रामायणासारखी मालिका दुरदर्शनवर संपता संपत नाही तसं होईल. त्यामुळे पुढल्या म्हणजे सहाव्या भागात ह्या कथेचा शेवट करू आणि त्यात उर्वरित थरारक भाग पाहू. त्यानंतर आपल्याला वाचायला मिळणार आहे आपली मध्येच थांबलेली 'कल्पवृक्ष गुगलची कथा'.

९ टिप्पण्या:

 1. अतिउत्तम सर...... तुमच लिखान एवढ मुद्देसुत आणि सुंदर असत कि वाचताना वेळेच भान रहात नाही........... आणि "Google Story" तुम्ही ईतक्या स्पष्ठपने आमच्या पुढे मांडली आहे कि याच कौतुकापलीकडे कौतुक करावस वाटत......कारण "Internet" वर मिळणारि "google" ची माहीती हि इतकी ओबडढोबड पसरली आहे की ति काही कळतच नाही...... माझ्याकडे "Google" वर अनेक पुस्तक English मध्ये आहेत.... ती मी वाचली,बरयापैकी कळाली......पण मायबोली ति शेवटी मायबोली..... तुमची बरिच संगणकावर आधारित पुस्तके आहेत...... ति सर्व उत्तमच आहे. तुम्हाला मी एक विनंति करतो मराठी मध्ये "Google" ची गाथा आम्हा मराठी तरुनांपर्यत(खास करुन माझ्या सारख्या "Computer Engineering" मधील Students ना) कळावी याकरता याचावर तुम्ही पुस्तक लिहावे. ही नम्र विनंती....!

  उत्तर द्याहटवा
 2. आभारी आहे गणेश. 'गुगल' हा विषय एका नाही, अनेक पुस्तकांचा आहे. दुर्दैवाने आपल्या मराठीत त्यावर आज एकही पुस्तक नाही हे खरे आहे. तुझी प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. बोलकी अशासाठी की गुगलवरची इंग्रजी पुस्तके तू वाचली आहेस, पण तरीही तुला आस आहे ती मायबोलीच्या शब्दांतून ती हकीगत वाचण्याची. मला वाटतं की तुझ्यासारखेच (माझ्यासकट) अनेक वाचक आहेत. आपली, संगणक डॉट इन्फोवर चाललेली कल्पवृक्ष गुगलची कथा वेगाने पु्र्ण करण्याचा माझा मानस आहे. पूर्ण होताच त्याचं पुस्तक नक्कीच होईल अशी आशा आहे. पण तत्पूर्वीही गुगल वर मराठीत कोणी पुस्तक लिहीलं तर मला आनंद होईल. तुझा अभिप्राय वाचून आनंद वाटला. धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 3. tumhi great aahat tumhi hi mahiti amha vachaka paryant pathwili tya sathi tumche abhinandan mi tumchya pudchya thararak ashi mahiti amha vachaka paryant dyal ashi vinavti

  उत्तर द्याहटवा
 4. कमेंटचा स्विकार केल्याबद्दल धन्यवाद सर.......... आणि हा!.....तुम्ही म्हणाला "तत्पूर्वीही गुगल वर मराठीत कोणी पुस्तक लिहीलं तर मला आनंद होईल".....पण मला अस वाटत की "Computer,Internet" अशा अवघड विषयावर अतिउत्तम लेखक म्हणजे तुम्हीच.........कारण एवढि पुस्तके आज पर्यंत तुम्ही आमच्यापुढे प्रस्तुत केली..... मला नाही वाटत की इतर कोणी हा विषय आमच्यापुढे "पुस्तकरुपी" मांडला.....तसे बरेच "Blogs" आहेत पण ते पण "Copy Content"(दुसरयाच चोरुन आपल आहे म्हनून विकणारे.).........म्हनून "Google" सारख्या विषयावर पुस्तक आल तर ते "शिरवळकर" सरांनी लिहल आहे असच कानावर येइल ..अशी अपेक्षा आहे.... हा आता त्याला वेळ लागेल..... तो भाग वेगळा पण "Google" आम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही त्यात डोक घालाल.

  उत्तर द्याहटवा
 5. टनाच्या मापानी स्तुती करण्यासाठी भारी जिगर लागते. ती तुमच्याकडे उदंड दिसते. सामान्यतः मराठीत तोळ्याच्या मापानी किंवा फार तर पाव किलोपर्यंत स्तुती करण्याची पद्धत आहे. ती वाईट नाही. तुमची प्रतिक्रिया आनंददायी आहे. बोलबोलता तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकून मोकळे झाला आहात. ही 'कल्पवृक्ष गुगलची कथा', तिला शक्य तितका न्याय देत तुम्हा वाचकांपुढे ठेवून 2012 च्या कोणत्या तरी महिन्यात मी त्यातून मोकळा होईन असं वाटतं. आभारी आहे गणेश.

  उत्तर द्याहटवा
 6. स्तुतीच कारण हे की "computer" हा नेहमी माझ्या जवळचा विषय..... आणि त्याची माहीती सांगणारा त्याहूनही अधिक जवळचा वाटतो...... आणि हि माहिती मला जर कोणी सांगत असेल तर...... त्या व्यक्तीशी बोलता बोलता माझ्या तोंडून कधी त्याची स्तुती होते हे मलाही कळत नाही...... "David A. Vise" यांच "The Google Story" हे पुस्तक वाचताना त्या माणसाबद्दल माझ्या मनात या प्रकारच्याच भावना आल्या........ गुगलची कथा दिवसेंदिवस रोमांचक होत आहे.... तुम्ही ती आणखी रोमांचक कराल यात काही शंखा नाही........ पुन्हा एकदा या तुमच्या "Blog" साठि धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा