१९ मार्च, २०११

कल्पवृक्ष ‘गुगल’ ची कथा (3) - क्रमशः

मायकेल ब्रिन
(वाचकांसाठी सुचनाः  ह्या लेखमालेतील हा तिसरा भाग आहे. सुरूवातीपासून भागांच्या क्रमानुसार वाचावं अशी विनंती आहे. त्यात अधिक रोचकता तर आहेच, पण स्थल, काल आणि नावे यांच्यातील सुसंबद्धताही त्याने साधली जाते. पूर्वीच्या भागांच्या लिंक्सः भाग 1,   भाग 2 )


रशियातील घालमेल                  


त्या काळी पदवी विद्यापीठात न शिकलेल्यांनाही पीएच.डी.साठी प्रबंध लिहीण्याची परवानगी मिळत असे. मायकेल ब्रिनने प्रबंधाची तयारी केली. त्या काळी ज्यू विद्यार्थ्यांला पीएच.डी.साठी ज्यू प्रशिक्षक घेता येत नसे. शेवटी त्याही परिस्थितीत मायकेलने प्रबंध संपवला आणि