७ मार्च, २०११

गुगलची वाटचालः क्षणचित्रे १९९८ ते २००३ (भाग पहिला)

गुगलचं सर्च इंजिन १९९८ साली कसं होतं? हे असः

तेव्हा गुगलचा पत्ता होता http://google.stanford.edu/ असा. कारण गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे १९९८ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत होते. अर्थात त्यामुळे गुगलचे सर्व हक्क तेव्हा स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडे होते. मग पुढे काय झालं..
-----------------------------------------------------------------
पुढे Google.com वर ते हललं, असः


-----------------------------------------------------------------
नंतर, १९९९ चा अवतार असा होता.


बीटा व्हर्जन, पण आता कॉपीराईटस गुगल कंपनीकडे आले होते. स्टॅनफोर्ड पर्व मागे पडलं होतं...
-----------------------------------------------------------------
जून २००१ मध्ये पहा काय स्थिती होती..

२००१ साली गुगल तुम्हाला विचारत होतं की पहिल्यांदा गुगलवर आला आहात? आमची ओळख (क्वीक टूर) करून घ्या. पण तेव्हा Images, Groups वगैरे नव्हते. 
-----------------------------------------------------------------
२००२ मध्ये हा फरक झाला...

आता Images, Groups ह्या विभागांची भर पडली होती. एकूण वेब पेजेसची संख्या कशी वाढत चालली होती तो आकडा जरूर पहा. 
-----------------------------------------------------------------
२००३ मध्ये 'न्युज' ची भर पडली..

-----------------------------------------------------------------
२००४ ते २०११ दरम्यान काय काय घडत गेलं.. 
पाहू पुढल्या भागात.

हिंदी गाण्यांची माहीत असलेली वेबसाईट.. माहीत नसणाऱ्यांसाठी

हिंदी गाणी. नवी जुनी.
क्लीक केल्यावर गाणं दिसतं आणि ऐकताही येतं. 
होय, इंटरनेट वरचं छायागीतच जवळ जवळ. 


लता, आशा, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमुर्ती, गीता दत्त, सुरैय्य़ा, शमशाद बेगम पासून ते श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, अलका याज्ञिक, साधना सरगम वगैरे गायिकांची विविध चित्रपटांतील छान छान गाणी.
दुसरीकडे, किशोर, रफी, मन्ना डे, गुलाम अली, हेमंत कुमार, महेंद्र कपूर, कुंदनलाल सैगल, सुरेश वाडकर, तलत महमूद, मुकेश ही नावं, तर त्यांच्याच जोडीला उदित नारायण, कुमार सानू, अभिजित, केके, सुखविंदर सिंग, कुणाल गांजावाला, शंकर महादेवन, अदनान सामी, महंमद अझीज, अमित कुमार ही सुद्धा. एस.पी. बालसुब्रमण्यम, जगजित सिंग, हरीहरन, पंकज उधास ही नावं देखील.
संगणकावर बसून काम करताना एका बाजूला गाणी ऐकत रहावं, स्वतःला सुखवावं आणि एकाग्रताही राखावी यासाठी एक छान साईट.
ही घ्या लिंकः
http://www.hindigeetmala.com/singer/

गंमतीचे क्षण..

आभारः माझा वर्गमित्र प्रविण कुलकर्णी अशा गंमतीदार लिंक्स
 वर्षभर पाठवत असतो. त्यातलीच ही एक लिंक. 
इंटरनेटवर काही गंमतीचे क्षण शोधता येतात.
आता उदाहरणार्थ मला एक वेब पेज माहीत आहे.
हे पान तुमच्या स्क्रीनवर अवतरू लागलं की तुम्हाला जे दृश्य दिसतं त्याने तुमच्या गालावरची खळी हलते. तुमचा शीणलेला मेंदू मनापासून हंसू लागतो. हे कसं घडतं? कोणताही विनोद नाही. शब्द नाहीत. कोणाचाही चेहेरा नाही. कसलही कार्टून नाही. तरी पण तुम्ही हंसता, गंमत वाटते म्हणून सुखावता.
असं काय घडतं?
ते पान अवतरताच तुमच्या स्क्रीनवर सर्वात वरच्या डावीकडील कोपऱ्यातून शे दीडशे माणसं धावत येतात. ह्या माणसांना चेहेरे नाहीत. नुसत्या सावलीवजा चिमुकल्या नग्न आकृत्या. जिवंत माणसांच्या. ही माणसं तुमच्या स्क्रीनवर धावत येऊन काय करतात?
भरपूर प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे ते आपापल्या जागी जाऊन गोल करतात. काही जण त्या गोलात थांबतात आणि घड्याळाचे काटे होतात. काही जण मिळून तास काटा बनवतात. काही मिनिट आणि काही सेकंद काटा असल्याने धावत राहतात. हो आणि ते असं बनलेलं माणसांचं घड्याळ वेळ मात्र बरोबर दाखवतं.
तुम्ही त्या घड्याळाकडे पहात राहिलात तर सेकंद काटा तुमच्यासमोर फिरत राहतो. एक मिनिट संपून साठ सेकंदांची पळापळीची राऊंड संपली की आतली माणसं गॅसचे रंगबिरंगी फुगे सोडून एक मिनिट गेल्याचा आनंद सुद्धा व्यक्त करतात.
असं हे घड्याळ काही क्षण पाहिलं आणि एक दोनदा ते रंगीत फुगे सुटून आभाळात निघून गेले की आपण सुखावतो, आणि आपल्या पुढल्या कामाला लागतो.
बघा प्रयोग करून.. ते वेब पेज, आय मीन ती लिंक हवीय ना, ही घ्याः
http://lovedbdb.com/nudemenClock/index2.html

फारसे वापरात नसलेले दोन शॉर्टकट

  
कीबोर्ड शॉर्टकटस आपण सगळेच जण वापरतो. त्यातले सगळ्यात कॉमन म्हणजे CTRL+C आणि CTRL+V हे कट पेस्ट करण्यासाठीचे शॉर्टकटस.
पण CTRL+Home आणि CTRL+End हे दोन शॉर्टकट आपल्या फारसे वापरात नसतात. इंटरनेटवर सर्फींग करताना बरेचदा खूप खोलपर्यंत गेलेले एखादे वेबपेज असते. वरून खाली जाण्यासाठी आपण माऊसचं स्क्रोलींग व्हील वापरतो, किंवा चक्क ड्रॅग करून पान खाली वर करतो. एकदम खाली वा एकदम वर जाण्या येण्यासाठी तुम्ही CTRL+Home आणि CTRL+End हे कीबोर्ड शॉर्टकटस वापरून पहा. तुम्हाला ते अतिशय सोयीचे वाटतील. आपल्याला CTRL+C आणि CTRL+V ची जशी सवय आहे, तशीच सवय आता  CTRL+Home आणि CTRL+End चीही लावून घ्यायला हवी.