१५ फेब्रु, २०११

महाराष्ट्राचे शेक्सपियर आणि आपण


इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं. राज्य, सत्ता आणि मुलुख किती महत्त्वाचा हे इंग्रजांना सांगायला नको. तरीही ते काय म्हणतात पहा. ते म्हणतात, ''एक वेळ आम्ही आमचं इंग्लंड देऊ, पण आमचा शेक्सपियर कोणाला देणार नाही.'' आता ह्या पार्श्वभूमीवर आपलं बघा. राम गणेश गडकऱ्यांना गौरवानं ' मराठीचे शेक्सपियर ' असं म्हंटलं जातं. गडकऱ्यांचा तो गौरव अगदी सार्थ आहे.
महाराष्ट्राचे शेक्सपियर असलेल्या राम गणेश गडकऱ्यांची जन्मतारीख आहे २४ मे १८८५. म्हणजे २४ मे २०१० ते २४ मे २०११ हा काळ गडकऱ्यांच्या १२५ व्या जयंतीचा काळ आहे. २०१० हे वर्ष महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणूनही गाजले. पण त्या वर्षात गडकऱ्यांची १२५ वी जयंती देखील आहे आणि आपण ती साजरी करावी हा विचार कोणाच्या मनात आल्याचे ऐकिवात नाही. इंग्रज त्यांच्या शेक्सपियरला जेवढे मानतात, तेवढी नाही, पण निदान वरवरची दखल तरी आपण आपल्या शेक्सपियरच्या म्हणजे राम गणेश गडकऱ्यांच्या बाबतीत ह्या महाराष्ट्रात घ्यायला हवी होती याबद्दल दुमत होऊ नये.
ह्या पार्श्वभूमीवर आलय www.ramganeshgadkari.com
त्यावर गडकऱ्यांचं समग्र साहित्य मोफत उपलब्ध आहे. होय, वाचण्यासाठी आणि कॉपी-पेस्ट करण्यासाठी सुद्धा... अवश्य भेट द्या. सर्वांनीच दखल घ्यावी अशी ही गोष्ट आहे..