१५ ऑक्टो, २०११

सर्वांसाठी उपयुक्त आणि अप्रतिम मोफत 'पेपर रेटर'

इंग्रजी लेखन शाळेत जे चिकटतं ते पुढे सुटत नाही. नोकरी व्यवसायातही पत्रं, ईमेल, मेमो, रिमार्कस लिहीणं हे चालतच राहतं. फक्त भर पडते ती आणखी घाईची, आणि त्यातून झालेल्या चुकांची. अशा सर्व स्थितींमध्ये Paper Rater हे उत्तम आणि मोफत असलेलं वेब अॅप आपल्याला एखाद्या आपल्या विश्वासू सहकाऱ्यासारखं कामी येतं..


जगात अक्षरशः हजारो छोटी-मोठी सॉफ्टवेअर किंवा अप्लीकेशन्स आहेत. त्यातली काही आपल्याला माहीत असतात, आणि माहीत असलेल्यापैकी काही निवडकच आपल्याला आवडत असतात. एखादं अॅप्लीकेशन आपल्या आवडीचं का असतं? त्यात कोणते गुण असले म्हणजे एखादं अॅप्लीकेशन आपल्या आवडीचं होतं? साधारणतः कोणते दोष असले तर ते आपल्या नावडीचं होतं? ह्या प्रश्नांची उत्तरं हा एक स्वतंत्र विषय आहे.
आज मला इतकच सांगायचं आहे की Paper Rater हे Web application किंवा Webapp माझ्या अतिशय आवडीचं आहे. मला आवडणाऱ्या पहिल्या पाच वेब अॅप्समध्ये मी Paper Rater चा नक्कीच समावेश करतो.
Paper Rater मला आवडतं याची काही कारणं खालीलप्रमाणेः
1) ते पूर्ण पणे, आणि अमर्याद काळासाठी मोफत आहे.
2) ते डाऊनलोड करावं लागत नाही. त्याचं इन्स्टॉलेशन करण्यात वेळ दवडावा लागत नाही. कोणतंही सेटींग आपल्या संगणकावर त्यासाठी करावं लागत नाही.
3) ते इंटरनेटवर मोफत वेब अॅप म्हणून उपलब्ध असल्याने जगात कुठेही गेलं तरी इंटरनेटवर ते वापरण्यासाठी उपलब्ध असतं.
4) ते वापरण्यासाठी कोणतंही रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. आपला ईमेल द्यावा लागत नाही. कोणताही फॉर्म भरावा लागत नाही. इतर कसलीही अट त्यासाठी नाही.
(वरील गुण हे आदर्श वेब अॅपच्या एकूण गुणांपैकी ठळक आहेत. )
त्या व्यतिरिक्त आता ह्या इतर जमेच्या बाजू पहाः
5) ज्या www.paperrater.com ह्या संकेतस्थळावर हे वेब अॅप वापरण्यासाठी उपलब्ध आहे त्याचे डिझाईन अतिशय स्वच्छ, सुटसुटीत आणि कळायला अगदी सोपे आहे. इंग्रजीत 'युजर फ्रेंडली' म्हणतात तशा प्रकारचे आहे.
6) ह्या वेब अॅप चा वेग तसेच त्याच्या संकेतस्थळाच्या सर्व्हर व डेटाबेसचा वेग देखील समाधानकारक आहे.
7) वेब अॅप वापरणाराच्या अपेक्षा 75 टक्के हून अधिक प्रमाणात सातत्याने पूर्ण करण्याची क्षमता Paper Rater मध्ये आहे.
8) FAQ आणि Help पुरेसे स्पष्ट आहेत.

paperrator.com चं होम पेज
वरील आठ वैशिष्ट्ये सुरूवातीलाच 'नमनाला घडाभर' म्हणावं तशी विषय सुरू करण्याआधी पटकन सांगून टाकली. त्यामुळे त्यांचा पुनरूच्चार नंतर पुन्हा करण्याची गरज राहणार नाही. आता अॅपच्या विषयाकडे वळूः

अॅपचा विषय - इंग्रजी भाषा आणि लेखन
इंग्रजी लेखनाशी संबंधित वेब अॅप म्हंटल्यावर काही घटक पटापट आपल्या डोळ्यासमोर येतात. ते घटक असेः
1) लेखनात वापरले गेलेले शब्द.
2) लेखनाची शैली आणि सफाई.
3) लेखनातील इंग्रजी व्याकरणाची अचूकता/निर्दोषता.
4) इंग्रजी स्पेलींग्ज.
5) प्रुफ रिडींगशी संबंधित दोष.
आयुष्यात इंग्रजी लेखन एकदा शाळेत  चिकटलं की ते पुढे सुटत नाही. आपण परिक्षा देतो तिथेही उत्तर पत्रिकेत उत्तरं लिहीतच असतो. किंवा अगदी ऑनलाईन परिक्षा दिली तरी तिथेही आपल्याला ऑनलाईन माध्यमातून लेखनच करायचे असते. फक्त पेनच्या ऐवजी कीबोर्ड इतकाच माध्यमाचा फरक होतो. व्याकरण, स्पेलींग्ज वगैरे घटक तेच राहतात.
परिक्षेचं सोडा, परिक्षा दिली, निकाल लागला, सर्टिफिकेट हातात पडलं आणि नोकरी व्यवसायात गेलो तरी इंग्रजी लेखन सुटत नाही. पत्रं, लिहीणं, ईमेल लिहीणं, मेमो लिहीणं हे निवृत्त होई तो चालतच असतं. लेखनाचे घटक तेच, न बदलणारे. नोकरी व्यवसायात त्यात पुढे भर पडते ती घाईची,  डेडलाईन न चुकवण्यासाठी चाललेल्या धडपडीची, टेंशनची आणि त्यामुळे झालेल्या चुकांची.
अशा सर्व स्थितींमध्ये Paper Rater आपल्याला एखाद्या आपल्या विश्वासाच्या सहकाऱ्यासारखा कामी येतो. ते वेब अॅप रहात नाही, तो एक हुशार, बहुधा बिनचूक असणारा, कुठेही आपल्या बरोबर असणारा, रजा न घेणारा,  सहकारीच असतो.
Paper Rater काय काय करतो पहाः
1) तुम्ही जे इंग्रजी लिहीलं किंवा टाईप केलेलं असेल त्याला ग्रामर चेक, स्पेल चेक लावून ते तपासून पहातो. पण तेवढच नाही, तर तो तुमची वाक्यरचनाही तपासतो. अतिशय लांब वा मोठं वाक्य झालं असेल तर ते तुमच्या निदर्शनास आणतो.
2) तुमच्या लेखनात तुम्ही जे शब्द वापरले आहेत तेही तो पहातो, आणि तुम्ही vocabulary मध्ये कमी पडला आहात का हेही तपासतो.
3) तुमच्या लेखनात एकूण किती अक्षरं आणि शब्द आहेत हे तर तो सांगतोच, पण तुमचं सर्वांत छोटं वाक्य किती शब्दांचं, आणि सर्वांत मोठं वाक्य किती शब्दांचं होतं हेही सांगतो. तुमची वाक्य सरासरी किती शब्दांची आहेत याचीही जाणीव तुम्हाला करून देतो. त्या बद्दल मार्गदर्शनही करतो.
4) तुम्ही इतर कोणाचं (तुमच्या सहकाऱ्याने केलेलं वगैरे) लेखन वाचत असाल तर त्यात इतर ठिकाणाहून चोरलेला मजकूर कट-पेस्ट करून बनवाबनवी केली आहे काय हेही तो तपासतो.
आपण एक उदाहरण घेऊ. खालील परिच्छेद पहा. वर वर बिनचूक वाटणाऱ्या ह्या परिच्छेदात  काही चुका आहेत. Paper Rater ला तो परिच्छेद वाचायला लावू, आणि तो त्या बद्दल काय सल्ला देतो ते पाहूः

परिच्छेद ः
 • One of the recent developments in modern technology, cellular phones, can be a threat to safety. A study for Donald Redmond and Robert Lim of the university of Toronto showed that cellular phones poses a risk to drivers. In fact people who talk by the phone while driving are for times more likely to have an automobile accident than those whom do not use the phone while drive. 
 • I like to use my cell phone when I am driving because it is convenient. 
 • The researchers studied 699 drivers. Who were in an automobile accident while they were using they're cellular phones. The researchers concluded that the mane reason for the accidents was not that people used one hand for the telephone and one hand for driving. Instead the cause of accidents were usually that the drivers became distracted angry or upset by the phone call. As a result the drivers' lost concentration. Many people and their wives and children find that monthly plans are more economical than pre-paid plans. • वरील परिच्छेद तपासून Paper Rater ने खालीलप्रमाणे चुका दाखवल्या.

 • पेपर रेटर चा अहवाल
  •  एकूणच ह्या परिच्छेदाच्या  पेपर बद्दल Paper Rater ने खालील तीन पानी अहवाल दिला, त्यातील काही ठळक बाबी पहाः. 

  Spelling
  Spelling Suggestions
  • Did you mean...: the mane [suggestions: main]
   Grammar
  Grammar Suggestions
  • Did you mean...: were using they're [suggestions: using their]
   Word Choice
  Bad Phrase Score
  Bad Phrase Score*: 2.761 (lower is better)
  *based on the number and quality of trite or inappropriate words, phrases, and cliches found in your paper.
  Great job - your score is above average! You know exactly which phrases to avoid in your writing.
   Word Choice
  Word Choice Suggestions
  No errors of this type found in the text.
   Style
  Transitional Phrases
  Transitional Words Score*: 122
  *based on quality of transitional phrases used within your paper
  Good job! Your usage of transitional phrases is within an acceptable range! Nevertheless, you may still benefit from reading the info below.
  One sign of an excellent writer is the use of transitional phrases. Transitional words and phrases (e.g. therefore, consequently, furthermore) contribute to the cohesiveness of a text and allow the sentences to flow smoothly. Without transitional phrases, a text will often seem disorganized and will most likely be difficult to understand. When these special words are used, they provide organization within a text and lead to greater understanding and enjoyment on the part of the reader.


  These words and phrases fall under a few grammatical categories:
  •  Conjunctions: but, provided, and, although
  •  Prepositional phrases: in addition to, in conclusion
  •  Adverbs: also, however, nevertheless

  Transitional phrases may be used in various places in a text:
  •  between paragraphs
  •  between sentences
  •  between sentence parts
  •  within sentence parts

  For example, you could write:
  Form and function are central themes in Biology. However, knowing the structure of something does not necessarily reveal its function.
  The word 'however' contributes to greater unity or cohesion between sentences.
   Vocabulary Words
  Vocabulary Score
  Vocabulary Score: 26
  Vocabulary Word Count: 1
  Percentage of Vocab Words: 1.02%
  Vocabulary Words in this Paper (a Subset): distracted
  This paper could benefit from greater usage of vocabulary words. Although your vocabulary score is within the average range for most writers, boosting it above 60 will help your paper stand out. Consider using the Vocab Builder.
  Tips
  Whether you are writing for a school assignment or professionally, it is imperative that you have a vocabulary that will provide for clear communication of your ideas and thoughts. You need to know the type and level of your audience and adjust your vocabulary accordingly. It is worthwhile to constantly work at improving your knowledge of words. To help with this task, please consider using our Vocabulary Builder to improve your comprehension and usage of words.

  अॅपच्या मर्यादा

  तुम्ही तुमचं लिखाण पेपर रेटर वर तपासून पहा. हे वेब अॅप तसं नवं आणि विकसनशील प्रकारातलं आहे. त्यात काही False negatives (बरोबर असून चूक आहे असं दाखवलं जाणं) आणि False positives (चुकलेलं असून ते बरोबर दाखवलं जाणं) येण्याची शक्यता बरीच आहे. त्या बद्दलची माहिती त्यांनी त्यांच्या FAQ सदरात दिलीही आहे. अशा प्रकारच्या अॅप्सना काही मर्यादा राहणं आजमितीला स्वाभाविक म्हणावं लागेल. त्यात सुधारणांना वाव असला तरी Paper Rater आज आहे त्या परिस्थितीतही उपयुक्त असल्याचं मला आणि माझ्या सहकाऱ्यांना अनेकदा अनुभवाला आलं आहे. 

  तुमचा अभिप्रायही अवश्य कळवा. किंवा, अशा प्रकारचं दुसरं एखादं Web App तुम्हाला माहित असलं तर तेही ह्या ब्लॉगवर मराठी किंवा इंग्रजीतून Comments देऊन सर्वांच्या माहितीसाठी अवश्य सांगा. 


  अशा विषयांवर इंग्रजीत खूप चर्चा होते. पण मराठीत ती फारच कमी होते. आपण ते चित्र बदलायला हवं.. 

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा