गुगलच्या जन्माचे धागे Data Mining ह्या विषयावर स्टॅनफोर्डमध्ये झालेल्या संशोधनामध्ये लपलेले आहेत हे तर त्यावरून आपल्या लक्षात येतच, पण सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांना गुगलच्या स्थापनेत सर्व प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन राजीव मोटवानी यांनी केलं आहे हेही स्पष्ट दिसून येतं.
मराठीतलं ते गाणं सर्वांनीच कधी ना कधी ऐकलेलं आहे. 'जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला..' राजीव मोटवानी यांची विद्यार्थ्यांमधील विक्रमी लोकप्रियता दृष्ट लागण्यासारखीच होती. राजीव यांचा जन्म 1962 चा. म्हणजे गुगलच्या जन्माच्या वेळी म्हणजे 1997 मध्ये ते फक्त 35 वर्षांचे होते. बुद्धी, अनुभव, शिक्षण आणि व्यक्तिमत्व या बरोबरच पस्तिशीत असणारा प्रचंड उत्साहही त्यांच्यात होता. गुगल कंपनीत त्यांची लक्षणीय गुंतवणूकही होती. पण राजीव अल्पायुषी ठरले.
-----------------------------------------------------------------------------------------
(वाचकांसाठी सुचनाः ह्या लेखमालेतील हा अकरावा भाग आहे. सुरूवातीपासून भागांच्या क्रमानुसार वाचावं अशी विनंती आहे. त्यात अधिक रोचकता तर आहेच, पण स्थल, काल आणि नावे यांच्यातील सुसंबद्धताही त्याने साधली जाते. पूर्वीच्या भागांच्या लिंक्सः भाग 1, पुढील लिंक्स )
----------------------------------------------------------------------------------------
स्टॅनफोर्डमधील शिक्षकः डॉ. राजीव मोटवानी
'गुगल' च्या कथेत डॉ. राजीव मोटवानी ह्या माणसाला विशेष आणि स्वयंभू म्हणावं असं स्थान आहे. राजीव भारतीय म्हणून आपल्याला त्याचं इतरांपेक्षा अधिक अप्रुप आहे. लॅरी आणि सर्जी यांच्यात सर्जीला राजीव यांचेबद्दल विशेष लोभ होता. लोभ म्हणण्यापेक्षा त्या दोघांची अधिक घनिष्ट मैत्री होती असं म्हणणं अधिक संयुक्तिक होईल. ह्या मैत्रीमुळे स्टॅनफोर्डमध्ये शिकत असताना 'गुगल' कंपनीच्या स्थापनेसाठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन लॅरी आणि सर्जी या दोघांनाही मिळाले.
राजीव यांचा जन्म जम्मूचा. बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीत झालेलं. पुढे आय.आय.टी. कानपूरला उच्च शिक्षण झालं आणि तेथून 1983 साली काँप्युटर सायन्समधील बी.टेक पदवी घेऊन पुढील शिक्षणासाठी राजीव अमेरिकेत कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठात पीएच.डी. घेण्यासाठी गेले. 1988 साली त्यांनी पीएच.डी. मिळवली आणि तेथून ते थेट स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिक्षक म्हणून रूजू झाले. राजीव यांचे व्यक्तीमत्व असे होते की विद्यार्थ्यांना त्यांचेबद्दल निसर्गतःच आपुलकी वाटे. ह्या व्यक्तीमत्वाला साजेसाच त्यांचा स्वभावही होता. कोणीही विद्यार्थी कधीही त्यांच्या खोलीत जाऊन त्यांचेशी संवाद साधू शके. राजीव शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे लोकप्रिय होते.
स्वतः राजीव लॅरी आणि सर्जीच्या स्वभावाबद्दल काय सांगतात पहा. राजीव म्हणतात, " ते दोघेही बुद्धीमान होते. मला आयुष्यात ज्या बुद्धीमान व्यक्ती भेटल्या त्यात त्यांचा समावेश आहे. पण त्या दोघांची बुद्धीमत्ता एकमेकांपासून वेगळी अशी होती. समजा जर एखादी वीस एक माणसांची बैठक असेल तर त्यात सर्जीने सर्व सुत्रे हातात घेतली आहेत असे दृश्य दिसे. त्या घोळक्यात लॅरी कुठे आहे की नाही हेही लक्षात येत नसे. पण बैठक संपल्यावर त्याच्या डोक्यातून एखादी चमकदार कल्पना येई आणि ती तो उत्साहाने बोलून दाखवे. "
सर्जी लॅरीच्या बराच अगोदर स्टॅनफोर्डमध्ये दाखल झाला होता हे आपण पूर्वीच्या भागात वाचलच आहे. आल्यापासूनच सर्जीचे राजीवशी सूर जुळले होते. डेटा मायनिंग हा राजीव यांचा आवडता विषय होता. हिमालयाएवढ्या माहितीतून एखाद्या शब्दाच्या संदर्भाची टाचणी शोधण्याचे तंत्र डेटा मायनिंगच्या विषयाचा एक भाग होते. स्टॅनफोर्डमध्ये राजीव यांनी ह्या विषयासाठी MIDAS नावाचा एक स्वतंत्र प्रकल्पच चालू केला होता. MIDAS म्हणजे MIning Data At Stanford. आज हा प्रकल्प थांबला असला तरी स्टॅनफोर्डने ह्या प्रकल्पाची माहिती देणारी लिंक आपल्या संकेतस्थळावर कायम ठेवली आहे. जिज्ञासूंना ती ह्या दुव्यावर पाहता येईल. गुगलची मुळे आपल्याला ह्या MIDAS प्रकल्पातून निघाल्यासारखी वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. MIDAS च्या उपरोल्लेखित दुव्यावर गेलात तर तिथे ह्या प्रकल्पांतर्गत जे संशोधन व लेखन झाले त्या प्रकाशनांचा तपशील आपल्याला Publications ह्या लिंकवर दिसतो. त्यातील सूची पाहिली की लक्षात येतं की राजीव मोटवानी आणि लॅरी व सर्जी यांनी एकत्रितपणे खूपच काम केलेलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधन-लेखनातील ही खालील काही प्रकाशने पहाः
1) What can you do with a Web in your Pocket?
Sergey Brin, Rajeev Motwani, Larry Page, Terry Winograd
Bulletin of the Technical Committee on Data Engineering 21(1998): 37-47
Sergey Brin, Rajeev Motwani, Craig SilversteinSergey Brin, Rajeev Motwani, Larry Page, Terry Winograd
Bulletin of the Technical Committee on Data Engineering 21(1998): 37-47
Proceedings of 1997 ACM SIGMOD, Montreal, Canada, June 1997
3) Scalable Techniques for Mining Causal Structures
Craig Silverstein, Sergey Brin, Rajeev Motwani, Jeffrey Ullman
Proceedings of VLDB'98, New York, New York, August 1998
Craig Silverstein, Sergey Brin, Rajeev Motwani, Jeffrey Ullman
Proceedings of VLDB'98, New York, New York, August 1998
गुगलच्या जन्माचे धागे Data Mining ह्या विषयावर स्टॅनफोर्डमध्ये झालेल्या संशोधनामध्ये लपलेले आहेत हे तर त्यावरून आपल्या लक्षात येतच, पण सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांना गुगलच्या स्थापनेत सर्व प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन राजीव मोटवानी यांनी केलं आहे हेही स्पष्ट दिसून येतं.
मराठीतलं ते गाणं सर्वांनीच कधी ना कधी ऐकलेलं आहे. 'जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला..' राजीव मोटवानी यांची विद्यार्थ्यांमधील विक्रमी लोकप्रियता दृष्ट लागण्यासारखीच होती. राजीव यांचा जन्म 1962 चा. म्हणजे गुगलच्या जन्माच्या वेळी म्हणजे 1997 मध्ये ते फक्त 35 वर्षांचे होते. बुद्धी, अनुभव, शिक्षण आणि व्यक्तिमत्व या बरोबरच पस्तिशीत असणारा प्रचंड उत्साहही त्यांच्यात होता. गुगल कंपनीत त्यांची लक्षणीय गुंतवणूकही होती.
पण राजीव अल्पायुषी ठरले. 5 जून 2009 रोजी आपल्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या आपल्याच मालकीच्या पोहोण्याच्या तलावात बुडून त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. ध्यानी मनी नसताना 47 वयीन राजीव मोटवानी हे जगच सोडून जातील हे कुणाच्या स्वप्नातही नव्हतं. स्टॅनफोर्डशी संबंधित सर्वांसाठी तर तो एक प्रचंड धक्काच होता. स्वतः सर्जी ब्रिनही त्या भयंकर बातमीने हादरला. सप्टेंबर 2008 मध्ये सर्जीने स्वतःचा व्यक्तीगत ब्लॉग सुरू केला होता. आजही तो तुम्हाला पाहता येतो. त्या ब्लॉगचा पत्ता आहे too.blogspot.com. ह्या ब्लॉगवर सर्जीने आपले गुरू राजीव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ती ह्या दुव्यावर उपलब्ध आहे. हा श्रद्धांजलीचा पोस्ट तुम्ही मूळात आणि संपूर्ण वाचायलाच हवा. त्यातली काही वाक्य इथे देण्याचा मोह मला आवरत नाही.. सर्जी लिहीतोः
Officially, Rajeev was not my advisor, and yet he played just as big a role in my research, education, and professional development. In addition to being a brilliant computer scientist, Rajeev was a very kind and amicable person and his door was always open. No matter what was going on with my life or work, I could always stop by his office for an interesting conversation and a friendly smile.
सर्जीच्या आयुष्यात राजीव यांचे स्थान कशा प्रकारचे होते ते ह्या वाक्यांवरून दिसते.
ही पुढची काही वाक्ये पहाः
When my interest turned to data mining, Rajeev helped to coordinate a regular meeting group on the subject. Even though I was just one of hundreds of graduate students in the department, he always made the time and effort to help. Later, when Larry and I began to work together on the research that would lead to Google, Rajeev was there to support us and guide us through challenges, both technical and organizational.
आणि हा शेवटचा परिच्छेद:
Eventually, as Google emerged from Stanford, Rajeev remained a friend and advisor as he has with many people and startups since. Of all the faculty at Stanford, it is with Rajeev that I have stayed the closest and I will miss him dearly. Yet his legacy and personality live on in the students, projects, and companies he has touched. Today, whenever you use a piece of technology, there is a good chance a little bit of Rajeev Motwani is behind it.
राजीव यांच्या मृत्यूनंतर जगभरच्या वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या. जगभर पसरलेले राजीव यांचे विद्यार्थी जेथे होते तेथे हळहळले.




2 वाचकांशी संवाद/कॉमेंटस:
Madhav Sir,
Thanks a lot for “kalpavruksh Google chi katha” we are eagerly waiting for next parts.
A humble suggestion, Just in case if you are not getting time to type in Marathi, It will be my pleasure to volunteer for you to type in Marathi. You can send me scanned hand written notes. I will type it and send it back to you. We are highly appreciating your efforts of bringing this wealth of knowledge in Marathi. We love your blog. It is one of the top-class.
Thanks again for your efforts.
~Yogesh.
Thank you so much Yogesh. From June I would be posting regularly. So nice of you.
Post a Comment