१४ मार्च, २०११

जपानमधील भीषण दृश्ये, गुगलने टिपलेली. अंगावर शहारे आणणारी..

जपानला कधी मानवी संहाराने हादरवले, तर कधी निसर्गाने त्याचा लावलेला संसार विस्कटून टाकला. देशालाही नशीबाचे फेरे चुकत नाहीत हेच खरं.
आपण वृत्तपत्रात बातम्या वाचतो, रंगीत फोटोही पाहतो. टीव्हीवरचे वृत्तांतही कधी आपल्या रिमोटच्या लहरीतून पाहता आले तर तेही पाहतो. पण सामान्यतः घरात पेपर आणि टीव्ही असूनही खरी स्थिती आपल्याला माहीत नसते.
गुगलने जपानला पाठवलेल्या मदतीच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण गुगलने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून टिपलेला विध्वंसापूर्वीचा जपान
आणि विध्वंसानंतरचा जपान याची शोकांत फोटो गॅलरी आपण पहायला हवी. गुगलने पूर्वी टिपलेला न्युक्लीयर प्लांट कसा दिसत होता, आणि भूकंपानंतर त्याचं दृश्य कसं आहे ते इथे दिसतं. अशी तुलनात्मक फोटो गॅलरी अन्य दुसऱ्या माध्यमात उपलब्ध असण्याची शक्यता जवळ जवळ नाही.
ती दृश्ये विदारक आहेत, पण निसर्गाचं क्रौर्य काय असतं हे एक माणूस म्हणून तुम्ही पहायला हवं. त्याचा स्लाईड शो तिथे आहे. तो अवश्य पहा. तो पाहण्यासाठी जा ह्या दुव्यावर.
इंटरनेटचं माध्यम, आणि त्यातही गुगल अर्थचं माध्यम तुम्हाला जेवढं अंतर्मुख करतं, तेवढा परिणाम वृत्तपत्र किंवा टीव्हीचं माध्यम करीत नाही याचा अनुभव गुगलची ही फोटो गॅलरी पाहताना येतो.
माध्यम जगतातल्या मंथनाचंही ते एक उदाहरण..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा