२० फेब्रु, २०११

वेबसाईटवरील रजिस्ट्रेशनसाठी एक युक्ती

एखाद्या साईटवर आपल्याला तात्पुरतं आणि बहुधा एकदाच जायचं असतं. तिथे पुन्हा पुन्हा जाण्याची आपल्याला गरजही लागणार नसते. पण जेएकदाच किंवा तात्पुरतं जाणं असतं त्यामागे रजिस्ट्रेशन करण्याची कटकट असते. आत जाऊन माहिती हवी असेल तर तो फॉर्म भरणंनावनवा पासवर्डनवं लॉगिन नेमईमेल असं सगळं (भले खोटं का असेना) द्यायचंमग ते तुम्हाला मेल पाठवणार. ती तुम्ही पहायची. त्यातली लिंक क्लीक करायची. अशा प्रकारे तुमचा ईमेल पत्ता 'verify' झाल्यावर मग तुम्हाला आत प्रवेश मिळणार. त्यामुळे ही वेबसाईटवरील रजिस्ट्रेशनची बरेच जणांना व्यर्थ कटकट वाटते. शिवाय जो ईमेल अड्रेस देऊ त्यावर स्पॅम म्हणजे कचरा मेल येण्याची शक्यताही खूप असते. यावर एका ऑस्ट्रेलियन माणसानं शक्कल काढली. त्याचं नाव माहित नाही. म्हणजे त्यानंच ते उघड केलेलं नाही. आता जो माणूस काहीतरी शक्कल काढतोआणि आपलं नाव गुप्त ठेवतो याचा अर्थ त्यात ती शक्कल सरळ नसणार हे आलच.
तुम्हाला जास्त बुचकळ्यात न ठेवता मी प्रथम त्या माणसाची शक्कल सांगतो. त्याने एक वेबसाईट तयार केली आहे. तिचं नाव http://www.bugmenot.com/ ह्या वेबसाईटवर त्याने आख्या जगासाठी विविध लोकप्रिय साईटसचे तयार (रेडी टू युज) लॉगिन आणि पासवर्डस ठेवले आहेत. त्यात न्युयॉर्क टाईम्स, IMDB, Youtube, washingtonpost, yahoo, adobe.com, वगैरे सारख्या किती साईटस असाव्यात? 'वायर्डह्या जगप्रसिद्ध नियतकालिकातील वृत्तानुसार १४000 साईटसचे लॉगिन आणि पासवर्डस तिथे उपलब्ध आहेत. आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे हा मुद्दा आणखी स्पष्ट होईल. समजा तुम्हाला www.washingtonpost.com ह्या वॉशिंग्टनपोस्ट दैनिकाच्या साईटवर जाऊन ताजी बातमी पहायची आहे. तरत्यासाठी तिथे गेल्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. मगच तुम्हाला साईटमध्ये मुक्त भटकंती करता येईल. त्या संदर्भात माहिती देणारी त्या साईटची ही विंडो पहाः

तुम्ही जर रजिस्टर केलत तर तुम्हाला काय काय मिळू शकेल याची यादी त्या
 विंडोत आहे. अशा रजिस्ट्रेशनला कंटाळणारी मंडळी ह्या http://www.bugmenot.com/वर जातात. तिथून तयार मिळणारा लॉगिन नेम आणि पासवर्ड उचलतात. तो वापरतात आणि त्या साईटमध्ये (रजिस्ट्रेशन न करताही) मुक्त संचार करतात. वेळ आणि कटकट वाचवण्याची ही टीप PC Mag सारख्या बड्याबड्या नियतकालिकांनी आणि about.com सारख्या मोठ्या साईटसनी प्रसिद्ध केली आहे. हा पासवर्ड त्या साईटवर कसा खुल्लम खुल्ला दिला जातो ते खालील चित्रावरून दिसेल. खालील चित्रात adobe.com चे लॉगिन आणि पासवर्ड दिले आहेत.

या मागे 
bugmenot चीही स्वतःची एक बाजू आणि तत्वज्ञान आहे. ते काय म्हणतात पहाः
Why not just register?
  • It's a breach of privacy.
  • Sites don't have a great track record with the whole spam thing.
  • It's contrary to the fundamental spirit of the net. Just ask Google.
  • It's pointless due to the significant percentage of users who enter fake demographic details anyway.
  • It's a waste of time.
  • It's annoying as hell.
  • Imagine if every site required registration to access content.
ही साईट असे मुद्दे घेऊन लढते. आजची वस्तुस्थिती ही आहे की bugmenot.com वर जाणारांची गर्दी सतत वाढतेच आहे. जी मंडळी रजिस्टर करतात त्यापैकीच काही जण bugmenot ला त्यांचा लॉगिन आणि पासवर्ड इतरांनी वापरावा ह्या हेतूने देत असतात. कारण सरळ आहेत्या लॉगिन आणि पासवर्डचा त्यांना काहीही उपयोग नसतो. तो सांभाळत बसण्यापेक्षा रजिस्ट्रेशन प्रक्रियेवर राग काढण्यासाठी ते आपला पासवर्ड bugmenot च्या साईटवर जाऊन देऊन टाकतात. असे पासवर्ड जमा करण्यासाठी bugmenot ने एका खास पानावर तशी सोय करून ठेवली आहे. असो.
जाता जाता सांगतो की नुकतेच मला तिथे आपल्या 'Indiatimes' चे तयार लॉगिन आणि पासवर्डही दिसले. म्हणजे कायतर आपल्याकडेही ह्या क्लृप्तीचा वापर करणारे कमी संख्येने नसावेत.
दुसरी युक्ती
bugmenot.com ने आणखी एक युक्तीही दिली आहे. ती तर अफलातूनच आहे. त्यांनी तुमच्यासाठी One time use ईमेल अड्रेस ची सोय केली आहे. म्हणजेएखाद्या साईटने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आणि तुमचा ईमेल पत्ता ते व्हेरीफाय करणार असले तर त्यासाठी काहीही म्हणजेrubbish@bugmenot.com असा ईमेल पत्ता द्यायचा. ह्या अशा कोणत्याही पत्त्यावरच्या ईमेलवर आलेला प्रतिसाद तुम्हाला २४ तासपर्यंत bugmenot च्या साईटवर बघण्याची सोय त्यांनी केली आहे. थोडक्यात कायतर हा जमाना 'युज अन थ्रोचा आहे. त्यात आता ईमेलचीही भर पडली आहे. दुसरंबाय द वेहा 'युज अन थ्रोईमेल पत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागत नाही हे स्पष्ट करतो. गंमतच आहे की नाही. काय काय स्पष्ट करावं लागतं बघा.
आणखी एक युक्ती
http://www.gishpuppy.com/

ही साईट डिस्पोजेबल वेब ईमेल पत्ता तुम्हाला अधिकृतपणे देते. ह्या साईटवर जायचं. रजिस्टर करायचं. ईमेल अड्रेस - उदाहरणार्थ abcd@gishpuppy.com असा काहीतरी घ्यायचा. यातलं वैशिष्ट्य म्हणजे ह्या पत्त्यावर तुम्हाला ज्या ज्या ईमेल येतील त्या आपोआप तुमच्या सध्याच्या ईमेलवर पाठवल्या जातील. म्हणजे तुमचा नेहमीचा ईमेल पत्ता गुप्त राहतो आणि अर्थातच त्यामुळे स्पॅमचा धोका रहात नाही. पण समजा तुमचा हा नवा gishpuppy चा ईमेल स्पॅमला सापडला,आणि त्यावर कचरा ईमेल येऊ लागल्या तरतो कचराही तुमच्या त्या गुप्त ईमेलवर येऊन नाही का पडणारअसे प्रश्न तुम्ही नक्कीच विचारणार. असं जर होऊ लागलं तर तुम्ही तो gishpuppy चा पत्ताच निकालात काढून टाकायचा. त्याजागी मग दुसरा घ्यायचा. gishpuppy च्या ईमेलची युक्ती बर्‍याच जणांना आवडते.त्याचं आणखी एक कारण म्हणजे Firefox आणि Internet Explorer साठी एक प्लगिन gishpuppy देतो. हा प्लगिन लावला की तुमच्या ब्राऊजरवर असताना तुमच्या माऊसच्या राईट क्लीकला Gish it नावाची एक कमांड मिळते. ज्या साईटवर रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या पानावर Gish it क्लीक करायचं. म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथे एक नवा gishpuppy ईमेल पत्ता दिला जातो. तो तुम्ही फक्त त्या रजिस्ट्रेशनसाठी वापरायचा. काम झालं की बाद करायचा. Gishpuppy आणिbugmenot यांच्यात फरक इतकाच की Gishpuppy ची सेवा जगभर रितसर मान्यताप्राप्त आहेतर bugmenot ला मात्र अजून नीतीवाद्यांची रितसर मान्यता अजून मिळालेली नाही. अर्थातमान्यतेची वाट पहात बसणारं आजचं जग नाही. त्यामुळेच Gishpuppy काय किंवा bugmenot कायदोन्हीही सारखीचकिंबहुना bugmenotकाकणभर जरा जास्तच लोकप्रिय आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा