२० फेब्रु, २०११

Recycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शकतात का?

Recycle Bin मधून फाईल्स डिलीट झाल्या तर त्या परत मिळवता येत नाहीत अशी बर्‍याच जणांची समजूत असते. Recycle Binही Windows ची एक डिरेक्टरी आहे. डिलीट केलेल्या फाईल्स इथे आणल्या जातात. जेव्हा आपण Recycle Bin मोकळी म्हणजेEmpty करतो तेव्हा त्या Windows मधून काढून टाकल्या जातात. मात्र त्यांची मुळे संगणकावर अस्तित्वात असतात. ज्यावेळी ह्या मुळांवर दुसर्‍या फाईल्स चढतात तेव्हा ती मुळे नाहीशी होतात. त्यानंतर मात्र फाईल्स परत मिळू शकणं अतिशय दुरापास्त किंवा जवळजवळ अशक्य असतं.Recycle Bin मधूनही गेलेल्या तुमच्या फाईल्स परत मिळविण्यासाठी Undelete Plus नावाचा मोफत उपलब्ध असणारा प्रोग्राम तुम्ही वापरायला हवा. http://www.undelete-plus.com/ ह्या साईटवरून तुम्ही तो डिलीट करू शकता.

२ टिप्पण्या:

 1. तुम्ही सांगितलेले हे undelete plus सोफ्टवेअर फ्रीवेअर नाही आहे. हवं तर तुम्ही वापरून पहा. त्यावर रजिस्टर करायला सांगतात. अशा वेळी मी काय करू प्लीज सांगाल का?

  Regards,
  Sunny A. Ghodekar

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद सनी.
  एके काळी जेव्हा ते फ्रीवेअर होते, तेव्हा लिहीलेली ती पोस्ट आहे. कालांतराने अनेक फ्रीवेअर अप्लीकेशन्स ही पेड किंवा शेअरवेअर होतात. असो. तुम्हाला मी Recuva हे फ्रीवेअर सुचवतो. http://www.piriform.com/recuva येथून ते डाऊनलोड करता येईल. तिथेच त्याची अधिक माहितीही मिळेल.

  उत्तर द्याहटवा