२० फेब्रु, २०११

जीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी

जीमेल वापरून ईमेल पाठवणारे आजकाल दहापैकी आठ इतके बहुसंख्येने दिसतात. जीमेलवर आपले अनेक पासवर्डस येऊन पडत असतात. कितीतरी गोपनीय किंवा व्यक्तीगत माहिती वा डेटा आपल्या ईमेलमधून जात-येत असतो. असा हा महत्वाचा जीमेल पत्ता कितपत सुरक्षित असतो? कुणी एखादा हॅकर आपली जीमेल हॅक करू शकतो का? आपल्या ईमेल जेव्हा जीमेलवरून जात येत असतात त्या ऑनलाईन प्रवासात मध्येच कुणी त्या टॅप करू शकेल का? हे प्रश्न आपण फारसे विचारात घेत नसतो.
ह्या पार्श्वभूमीवर आपण बॅंकांचं उदाहरण घेऊ. आजकाल बँकांच्या वेबसाईट आणि ऑनलाईन बँकींग सेवा सर्वत्र उपलब्ध झाली आहे.आपल्या अकाऊंटमधून पैसे काढणे, ट्रान्सफर करणे, अकाऊंटमधले पैसे वापरून ऑनलाईन खरेदी करणे हे आता दैनंदिन जीवनाचा भाग होऊन गेलय. अशा वेळी आपल्या बँक अकाऊंटचा पासवर्ड आणि एकूणच व्यवहार सुरक्षित रहावा यासाठी बँकांच्या वेबसाईटस विशेष ऑनलाईन सुरक्षा आपल्या अकाऊंटला देत असतात. हे नीट समजण्यासाठी आपण ICICI Bank च्या वेबसाईटचं उदाहरण घेऊ. तुम्ही तुमच्या इंटरनेट ब्राऊझरमध्ये http://icicibank.com असं टाईप करून एंटर बटण दाबलत तर तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाता. तुमच्या ब्राऊझरमध्ये त्यावेळी खालीलप्रमाणे साईटचा पत्ता दिसत असतो.आता तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सर्वात वर डावीकडे दिसणार्‍या लॉगिन विभागाकडे या.तुम्ही जेव्हा लॉगिनच्या Personal किंवा Corporate वा तत्सम लिंकवर क्लीक करता तेव्हा तुमच्यासमोर लॉगिन नेम व पासवर्ड टाईप करावयाचे पान येते. इथून तुम्ही तुमचं अकाऊंट उघडणार असता. हे पान अतिशय सुरक्षित ठेवण्याची काळजी सर्वच बँकांप्रमाणे ICICI Bank ने देखील घेतली आहे. ह्या पानाचा तुमच्या ब्राऊझरवर असलेला पत्ता पहा. खालीलप्रमाणे दिसत आहे.जेव्हा तुम्ही साधी साईट उघडलीत तेव्हा त्या पत्त्यात केवळ http अशी सुरूवात होती. जेव्हा तुम्ही लॉगिन व पासवर्डच्या पानावर गेलात त्यावेळी त्या पानाचा पत्ताhttp ऐवजी https ने सुरू होणारा होता. म्हणजेच लॉगिन-पासवर्डचे पान येताच http मध्ये s ची भर पडली आहे. हा s असतो विशेष सिक्युरिटीचा. ह्या पानावर जे टाईप होईल व जे व्यवहार होतील ते सारे विशेष सुरक्षित राहतील असा त्याचा अर्थ. आजकाल व्हीआयपींना झेड सिक्युरिटी दिली जाते. Https चा अर्थ तुमच्या पानाला अशी एक प्रकारची ऑनलाईन झेड सिक्युरिटी मिळालेली आहे.
आता आपल्या जीमेलकडे वळू. तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. लॉगिन केल्यावर तुमच्या ब्राऊझरच्या पत्त्यात काय दिसते आहे? जर http असेल तर तुमचा लॉगिन आणि तुमच्या मेलना https ची विशेष सिक्युरिटी उपलब्ध नाही. त्यातही जर तुम्ही wi-fi झोन मध्ये असाल वा wi-fi इंटरनेट वापरत असाल तर तुमच्या झोनमधला इतर कोणी तुमचा ईमेल पत्ता तुमच्या नकळत पाहू शकतो. पॅरालल टेलिफोन लाईनवर टेलिफोनवरचं बोलणं ऐकणं असतं ना तसाच काहीसा हा प्रकार असतो. मात्र तुमचा लॉगिन https प्रकाराने युक्त असेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नसते. कारण तुमच्या ईमेलला वा त्या पानावरच्या ऑनलाईन व्यवहाराला विशेष सुरक्षा असते.
तुम्ही तुमची जीमेल उघडलीत. पत्ता पाहिलात. तो http प्रकारचा आहे का? असेल तर तो बदलून तुम्ही https करून तुमची ईमेल विशेष सुरक्षा कवचाच्या आत ठेवायल हवी. आता जीमेलने अशा सुरक्षेची सोय तुमच्या-आमच्यासाठी केली आहे. पण ती तुम्ही अक्टीव्हेट करायला हवी. जोपर्यंत तुम्ही ती अक्टीव्हेट करीत नाही,तोपर्यंत तुमचा पत्ता http चाच राहणार. अक्टीव्हेट करणं हे अगदी सोपं आहे. त्यासाठी प्रथम तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. मग Settings वर क्लीक करा. सेटींग पानाच्या तळाशी पहा दोन पर्याय दिलेले आहेत. एक आहे - Always use https. दुसरा आहे - Don't always use https. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमच्या जीमेलवर कोणताही पर्याय निवडलेला नाही.जीमेलने खरं तर स्वतःच न विचारता https पर्याय निवडायला (by Default) हवा होता. पण त्यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे आपण तो निवडणे भाग आहे. माऊसने क्लीक करून तो पर्याय निवडून घ्या. मग खालीलप्रमाणे चित्र दिसेल.आता हे सेटींग सेव्ह करा आणि त्या पानावरून बाहेर पडा. आता पुन्हा लॉगिन करून पहा. तुम्हाला https चा लॉगिन पत्ता मिळालेला दिसेल. याचा अर्थ आता तुमची जीमेल विशेष सुरक्षा कवचाखाली आली आहे. इतरांना ती पासवर्डशिवाय ऑनलाईन हॅक करणं आता अगदी अशक्यप्राय आहे.
ही सुविधा जीमेलने अगदी अलिकडे देऊ केली आहे. त्यामुळे आपल्यापैकी १० तल्या ९ जणांना त्याची माहिती नसण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मित्रांना आपण याची माहिती त्वरित द्या. आपली आणि आपल्या सर्वांची जीमेल सुरक्षित करणं महत्वाचं आहे. त्यासाठी इथे दिलेली टीप प्रत्येकाला सांगणं हे आपण कर्तव्य म्हणून करायला हवं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा