२० फेब्रु, २०११

संपूर्ण सीडी (७०० एम. बी.डेटा) पाठवायचीय ऑनलाईन?

याहू असो की जीमेलआणि हॉटमेल असो की आणखी कुठली वेबमेल असोतुम्ही तुमच्या ईमेलला जास्तीत जास्त किती एम.बी. ची फाईलAttach करणार याला मर्यादा असते. ही मर्यादा सर्वत्र १० एम.बी. पर्यंतचीच असते. ज्यावेळी ह्या मर्यादेपेक्षा मोठी फाईल पाठवण्याची वेळ येते तेव्हा मार्ग खुंटलेला असतो. आजकाल लग्ना-मुंजीला व्हिडीओ शुटींग करण्याची पद्धत रूढ आहे. अगदी साधे फोटो घेतले तरी त्यांनी एक आख्खी सीडी भरलेली असते. अशी एखादी संपूर्ण सीडी समजा ईमेलला अटॅच करून पाठवायची आहेतर काय करायचंते शक्य आहे काशक्य असेल तर त्याला काही खर्च येईल काखर्च येणार असेल तर तो कितीअसे वेगवेगळे प्रश्न ही चर्चा उपस्थित झाल्याने तुमच्या मनात डोकावले असणार.
तुमच्या प्रश्नांची ही घ्या उत्तरं.
१) संपूर्ण सीडीचा म्हणजे अदमासे ६५० ते ७०० एम.बी. चे व्हिडीओ शुटींग वा फोटोग्राफ्स वा कोणताही डेटा तुम्ही ऑनलाईन म्हणजे इंटरनेटचा वापर करून पाठवू शकता. होयते सहज शक्य आहे. मी स्वतः अनेकदा असा डेटा पाठवला आहे. अजुनीही पाठवत असतो.
२) असा १००० एम.बी. (होय, 1000 MB) पर्यंतचा डेटा पाठवायला शुन्य खर्च येतो. म्हणजेचही सुविधा इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. तुम्हीही त्याचा लाभ घेऊ शकता. तुमची आख्खी सीडी कोणत्याही ईमेल पत्त्यावर अटॅच करून पाठवू शकता.
आता तुमचा पुढला प्रश्न आहे- हे कसं करायचं?त्याचं उत्तरही सोपं आहे. हे काम पांडोकडून करून घ्यायचं.
तुमचा परत प्रश्न येणार की हा पांडो कोण?पांडो हे नाव आपल्या पांडू हवालदारसारखं भारतीय वाटत असलं तरी हा पांडो भारतीय नाही. तो अमेरिकन आहे. तुम्हाला जास्त कोड्यात न टाकता सांगून टाकतो की पांडो हा अमेरिकन माणूस नसून ते एक सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर किंवा हा प्रोग्राम सर्वांसाठी मोफत आहे. तो उपलब्ध आहे http://www.pando.com/ ह्या साईटवर.
पांडो ची सध्याची आवृत्ती (
Version) आहे २.३ ह्या २.३ आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल की पांडो हा काही फार जुना प्रोग्राम नाही. तुमचा अंदाज बरोबर आहे. पांडो नेटवर्कस ही न्युयॉर्क येथील कंपनी मूळातच २००४ साली स्थापन झाली आहे. त्यामुळे हा प्रोग्राम जेमतेम ५ वर्षे वयाचाच आहे. पण त्या पहिल्या दोन वर्षांत त्याने चांगलं बाळसं धरलेलं आहे. pando.com वर जाऊन तुम्ही हा प्रोग्राम डाऊनलोड करून घ्या. तो केवळ ३ एम.बी. चा असल्याने काही मिनिटांत डाऊनलोड होतो आणि तेवढ्याच झपाट्याने आणि सहजपणे तो इंन्स्टॉलही होतो. हे इंन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुमच्या कॉंप्युटरच्या तळाशी उजव्या बाजूला जेथे वेळ (time)दाखवलेला असतो तेथे लागून असलेल्या आयकॉन्समध्ये पांडोचा आयकॉनही आल्याचं तुम्हाला दिसेल. ह्या आयकॉनवर डबल क्लीक करा. पांडो उघडेल. तुम्हाला मेल पाठवायची असेल तर Share New वर क्लीक करा. पुढे तुमची फाईल अटॅच करामेल मध्ये जो संदेश लिहायचा तो लिहाज्याला ईमेल पाठवायची त्याचा ईमेल अड्रेस लिहा आणि Send वर क्लीक करा. पांडो अवजड फाईल्सही अतिशय झपाट्याने पाठवतो.
ज्याला तुम्ही फाईल पाठवलीत त्याला .pando ह्या प्रत्ययाची (extension) फाईल त्याच्या ईमेल पत्त्यावर मिळते. त्यानेही आपला पांडो उघडावा आणि फाईल डाऊनलोड करून घ्यावी. त्याच्याकडे पांडो नसला तर त्यानेही वर सांगितल्याप्रमाणे तो डाऊनलोड करून घ्यावा. पांडो कसा वापरायचा याचे उत्तम मार्गदर्शन पांडोच्या साईटवर आहे. वाटल्यास त्याची मदत घ्या. पण माझा अनुभव असा आहे की अगदी शाळकरी मुलं सुद्धा पांडोचा उपयोग पटकन समजून घेतात.
पांडो का खरच जबाब नही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा