२० फेब्रु, २०११

पीडीएफ एडिट करायचीय? ही घ्या वेब ट्रीक.

परिस्थिती आणि पीडीएफ सांगून येत नाहीत म्हणतात. होतं असं की कुणीतरी पीडीएफ पाठवतं. आपल्याला ती वाचायची असते. वाचता वाचता त्यात दिसतात स्पेलींगच्या घोडचुका. आपल्याला मोह होतो. त्या तिथल्या तिथे सुधारण्याचा. पण पीडीएफ फाईल ती. एडिट करायची कशी? त्याला पीडीएफ एडिटर हवा. अक्रोबॅट हवा. आपल्याकडे पीडीएफ एडिटर नसेल किंवा काही कारणाने तो चालत नसेल तर?. करायचं काय? अशा परिस्थितीता उपयोगी पडणारी एक वेब साईट आहे. तिचं नाव आहे -


तिथे जाऊन आपली पीडीएफ फाईल अपलोड करायची. आपला ईमेल पत्ता द्यायचा. .doc मध्ये किंवा rtf मध्ये रूपांतरीत झालेली आपली पीडीएफ फाईल आपल्याला ईमेलने पाठविली जाते. मग रूपांतरीत झालेल्या त्या doc/rtf फाईलला आपल्या वर्डमध्ये किंवा ओपन ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही वर्ड प्रोसेसरमध्ये उघडायचं आणि ती एडिट करायची. खटकलेली स्पेलींग्ज वगैरे सुधारायची आणि पुन्हा त्या वर्डची पीडीएफ करून घ्यायची.

सुप्रसिद्ध NITRO PDF ची ही सेवा आहे. पीडीएफ चं doc किंवा rtf रूपांतर अतिशय तंतोतंत होतं असा त्यांचा दावा आहे. आपल्याला अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. कारण ही सेवा मोफत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा