Nov 10, 2012

गुगल मराठी सर्च: एक नवी क्लुप्ती


 तुमच्या ज्या मित्रमंडळींना ही क्लुप्ती माहीत नाही त्यांना sanganak.info  वर जाऊन त्याची माहिती घ्यायला सांगा. किंवा तुमच्या फेसबुक पानावर ह्या पोस्टची लिंक तुमच्या मित्र परिवारासाठी अवश्य द्या. 

Mar 11, 2012

10,000 जाहिरातींचा जबरदस्त संग्रह

 ह्या संकेतस्थळावर 1830 ते 1920 ह्या काळात विविध वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये छापल्या गेलेल्या 10,000 जाहिराती पहायला मिळतात. एवढा मोठा जुन्या जाहिरातींचा एकत्रित संग्रह करणारं दुसरं संकेतस्थळ असणं अवघड आहे.

Mar 10, 2012

हॅटस ऑफ टू क्रेग सिल्व्हरस्टीन!

क्रेग सिल्व्हरस्टीन.. गुगलमध्ये त्याचं पद फार मोठं होतं. 'डायरेक्टर, टेक्नॉलॉजी'. 1998 ते फेब्रुवारी 2012 हा सुमारे 14 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्याने गुगलमध्ये काढला.  ताजी बातमी म्हणजे 10 फेब्रुवारी 2012 पासून त्याने गुगल कंपनी सोडली. राजीनामा देऊन तो बाहेर पडला...

Mar 8, 2012

कल्पवृक्ष ‘गुगल’ ची कथा (19) - क्रमशः

Ram’s book of mistakes असा एक वाकप्रचार सिलिकॉन व्हॅलीमध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. प्रत्यक्षात श्रीराम यांनी अशा प्रकारचे कोणतेही पुस्तक लिहीलेले नाही. परंतु त्यांच्या अनुभवांचा आणि चुकांचा उल्लेख करीत नव्या कंपन्यांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचं मार्गदर्शन ते करीत असत. गुगललाही अशा प्रकारचे फार मोठे मार्गदर्शन राम श्रीराम यांनी दिले. याबद्दलचा एक किस्सा असा सांगतात की श्रीराम यांनी एकदा....

कल्पवृक्ष ‘गुगल’ ची कथा (18) - क्रमशः

के. राम श्रीराम
1998 च्या सुरूवातीस कधीतरी स्टॅनफोर्डमध्ये असतानाच प्रा. उलमन यांनी एका महत्त्वाच्या व्यक्तीची लॅरी-सर्जीशी ओळख करून दिली होती. त्या व्यक्तीबद्दल दोघांनीही स्टॅनफोर्डमध्येच बरच ऐकलंही होतं. जे ऐकलं होतं त्यातून दोघांच्याही मनात त्या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला होता. खास उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ती व्यक्ति भारतीय होती.

Mar 1, 2012

कल्पवृक्ष ‘गुगल’ ची कथा (17) - क्रमशः

गुगलचं स्वतःचं स्वयंपाकघर आता सुरू झालं होतं. काम करा, खा, प्या, मजा करा हे वातावरण आपल्याप्रमाणेच आपल्या तरूण सहकाऱ्यांना आवडेल हा लॅरी आणि सर्जी ह्या दोघांचाही अंदाज बरोबर होता. गुगलचं हे पहिलं स्वयंपाकघर उर्फ मायक्रो वेव कीचन कसं होतं हे खालील युट्युब व्हिडिओमध्ये प्रत्यक्षच पहाः

Feb 27, 2012

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-6)

जामिन मिळाल्यानंतरची मुद्रा..
वाचकहो, गेल्या बुधवारी म्हणजे 22 फेब्रुवारी 2012 रोजी न्युझीलंड न्यायालयाने त्याला जामिन दिला. कीम डॉटकॉम आता पुन्हा आपल्या हवेलीत पोहोचला आहे. जामिन देताना कोर्टाने दोन अटी कीम डॉटकॉमला घातल्या आहेत. एक, त्याने त्याचं विमान वापरायचं नाही. दुसरी, त्याने इंटरनेट वापरायचं नाही. ज्याने आपलं आडनाव बदलून डॉटकॉमअसं घेतलं त्याने इंटरनेट वापरायचं नाही”  असा विनोद नियतीने केला आहे.